Satara | धक्कादायक! शरद पवारांच्या निष्ठावंत आमदाराचा एका मताने पराभव | Sakal Media |

2021-11-23 8,573

सातारा जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीत जावळी तालुका सोसायटी मतदारसंघात संघातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक ज्ञानदेव रांजणे यांचा एक मताने विजय झाला असून, आमदार शशिकांत शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. या निकालानं जिल्ह्यात राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून अनेक घडामोडी यामुळे घडणार आहेत. या निवडणुकित 49 मतदानापैकी आमदार शिंदे यांना 24 मते मिळाली, तर विजयी उमेदवार रांजणे याना 25 मते मिळाली. जावलीतील एक जागेसाठी 100 टक्के मतदान झाले होते. सर्वच्या सरर्व 49 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. मंगळवार (ता. 23) साताऱ्यात सकाळी आठपासून मतमोजणीस प्रारंभ झाला.
#election #politics #satara #maharastra

Videos similaires